VIDEO | अंधश्रद्धेचा कळस! चिमुरड्यांना ग्रहण काळात चक्क जमिनीत गाडलं...

अश्विनी जाधव केदारी
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

आपल्या देशात सूर्यग्रहण आणि अंधश्रद्धा यांचं जणू समीकरणच झालय. असाच एक प्रकार कर्नाटकात पाहायला मिळाला. इथंल्या कलाबुर्गी जिल्ह्यात चक्क मुलांना मानेपर्यंत जमिनीत गाडण्यात आलं.

आपल्या देशात सूर्यग्रहण आणि अंधश्रद्धा यांचं जणू समीकरणच झालय. असाच एक प्रकार कर्नाटकात पाहायला मिळाला. इथंल्या कलाबुर्गी जिल्ह्यात चक्क मुलांना मानेपर्यंत जमिनीत गाडण्यात आलं.

मानेपर्यंत मातीत गाडलेली ही चिमुकली. आणि त्यांचे हे पालक. हे दृश्य आहे कर्नाटकातल्या कलबुर्गी जिल्ह्यातल्या सुलतानपुरात इथलं. सूर्यग्रहणाच्या काळात इथं मुलं गाडण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून होतोय. अपंग मुलांना अशाप्रकारे गाडलं जातंय. असं केलं तर अपंगत्व जातं अशी या भोळ्याभाबड्या लोकांची श्रद्धा. पुन्हा एकदा पाहा मातीत गाडल्यामुळे या मुलांचा जीव कासावीस झालाय. माथ्यावर सूर्य आणि संपूर्ण शरीर मातीत. पण मोठ्या माणसांना त्याची परवा नाही. केवळ पुर्वापार कुणीतरी सांगितलं म्हणून हा सगळं करण्यात आलंय. ग्रहणकाळात अंधश्रद्धेतून असे शेकडो प्रकार देशात कुठे ना कुठे तरी पाहायला मिळतात.

कर्नाटकातला हा प्रकार पाहिल्यानंतर आपण म्हणायला फक्त 21 व्या शतकात आहोत, बाकी आपलं शरीर आणि मन अनिष्ट रूढी, परंपरांमध्येच गुंतलंय असंच म्हणता येईल. 

Web Title -  childrens  Buried in the ground in solar ellipse period


संबंधित बातम्या

Saam TV Live