VIDEO | भारताकडून चीन ओरपतोय अब्जावधींची मलई

साम टीव्ही
शनिवार, 2 मे 2020
  • भारतीय बाजारपेठेवर चीनचा तब्बल 57 टक्के ताबा
  • भारताकडून चीन ओरपतोय अब्जावधींची मलई
  • चीनशी व्यवहार करून भारताला मात्र मोठा तोटा

आता बातमी साम टीव्हीच्या मोहिमेची... कोरोनाचं संकट चीनमुळे आल्याची भावना जगभरात वेगाने पसरतेय. त्यामुळे चीनसोबत व्यावसायिक संबंध तोडण्याचीही चर्चा जोरातय. भारतातही चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची जनभावना निर्माण झालीय

कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमध्ये सापडला आणि नंतर कोरोनामुळे संपूर्ण जगच वेठीस धरलं गेलं. त्यामुळे कोरोनाचं संकट उभं राहिल्यापासून संपूर्ण जग चीनकडे संशयाने बघतंय.  त्यातच चीनने केलेले दावे, आकड्यांची केलेली लपवाछपवी यावरून जगाचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. म्हणूनच जगभरातील बहुतांश देश चीनशी व्यवहार करण्याबाबत विचार करू लागलेयत. भारतातील जनताही चीनशी व्यावसायिक संबंध तोडण्याबाबत चर्चा करू लागलेयत. कारण भारताच्या बाजारपेठेवरही चीनचा मोठा ताबा आहे. मात्र भारत आणि चीनच्या व्यावसायिक संबंधात भारत कायमच तोट्यात राहिलाय. कारण, चीनकडून भारतात येणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत भारताकडून चीन मात्र अत्यंत कमी वस्तू खेरदी करतंय.

चीनसोबत व्यवहार करून भारत तोट्यातच

भारतातील अनेक बाजारपेठांवर चीनचा तब्बल 57 टक्के ताबा असल्याची आकडेवारी समोर आलीय. भारतीय बाजारपेठेत चीनच्या मोबाईलचा दबदबा सर्वात जास्त आहे. त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक वस्तू, विजेची उपकरणं, रासायनिक पदार्थ, जैविक पदार्थ, खतं, खेळणी अशा अनेक वस्तू भारत चीनमधून आयात करतो. त्याबदल्यात भारताकडून चीन फक्त कापूस, तांब्याच्या वस्तू, हिरे अशा मोजक्याच वस्तू खरेदी करतोय. त्यामुळे भारत-चीन व्यवहारात भारताला कायम नुकसानीची झळ सोसावी लागलीय. चीनसोबत व्यवहार करून भारताला वर्षाकाठी सुमारे 41 अब्ज कोटी डॉलरचं नुकसान होतंय.

भारतीय बाजारात चीनच्या वस्तू तब्बल 57 टक्के आहेत. म्हणजेच निम्म्याहून अधिक भारतीय बाजारपेठेवर चिनी वस्तू राज्य करतायत. म्हणजेच भारताच्या पदरी तोटा टाकून चीन मात्र अब्जावधींची मलई ओरपतोय. त्यामुळे कोरोनाच्या संकटामागे चीनचा हात असेल तर भारतानं चीनसोबत व्यावसायिक संबंधाबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आलीय आणि प्रत्येक भारतीयानंही चीनच्या वस्तू खरेदी करताना दहा वेळा विचार करायलाच हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live