चीनच्या कपटीपणाचं शिकार झालं सारं जग? चीन नेमकं काय लपवतंय?

साम टीव्ही
सोमवार, 30 मार्च 2020

चीन सरकारनं कोरोनाबाबत जगापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला पण चीनच्याच नागरिकांनी सरकारच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला. अर्थात त्याची शिक्षाही त्यांना भोगावी लागली. डॉ. ली वेनलिआंग यांच्याशिवाय वुहानची एक डॉक्टर आयफिननं कोरोनासंबंधी एक धक्कादायक वास्तव जगासमोर आणलं.

चीन कोरोनासंबंधी साऱ्या जगापासून खूप काही लपवायचा प्रयत्न करतोय, पण त्याचं हे कारस्थान फार काळ टिकणार नाही. डॉ. ली वेनलिआंगनंतर चीनच्या आणखी एका डॉक्टरनं चीनच्या कपटीपणाचा पर्दाफाश केलाय. वुहान सेंट्रल हॉस्पिटलच्या इमर्जंसी विभागाच्या डायरेक्टर डॉ.आय फेन यांनी चीन सरकारवर गंभीर आरोप केलेत. एका मुलाखतीत आय फेन यांनी सांगितलं की

चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी मला धमकी दिली होती की या व्हायरसबद्दल कुठे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. 

कोरोना व्हायरसबद्दल असा दावा करण्यात आलाय की हा व्हायरस वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजीत निर्माण झालाय. आता हा व्हायरस अख्ख्या जगात पसरलाय. दरम्यान हा व्हायरस मानवनिर्मित नसल्याचा दावा चीन सरकार करतंय. जर चीनचा हा दावा खरा मानला तर मग चीनमधलेच डॉक्टर चीनच्या भूमिकेवर प्रश्न का उपस्थित करतायत? हा प्रश्न कायम राहतोय. 

डॉ. आयफेननं जगाला सांगितलं की, मला जर माहिती असतं की हा व्हायरस साऱ्या जगात थैमान घालणार आहे तर मी नक्कीच शांत बसले नसते. मी साऱ्या जगाला या व्हायरसबद्दल सांगितलं असतं. कुठल्या ना कुठल्या माध्यमाद्वारे ही माहिती मी साऱ्या जगाला दिली असती. भलेही मला जेलमध्ये जावं लागलं असलं तरीही. 

डॉ. आय फेन यांची मुलाखत चीन सरकारनं सगळ्या माध्यमांमधून.. अगदी सोशल माध्यमांमधूनही हटवून टाकलीय. डॉ. फेन यांच्यापूर्वी वुहान सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉ. ली वेनलिआन यांनीही चीनी अधिकाऱ्यांना या व्हायरसबद्दल सतर्क केलं होतं. पण त्यांनाही धमकी दिली गेली. त्यानंतर डॉ. ली यांचाही कोरोना व्हायरसनं मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू कोरोनामुळं नाही तर कोरोनाबद्दल इशारा दिल्यामुळे चीन सरकारनं घडवून आणला होता, याचं कवित्व अजूनही रंगलंय. कोरोना व्हायरस आला कुठून, आला की आणला गेला याचं रहस्य काय आहे हे कुणालाच माहिती नाही. पण कोरोनाविषयी थोडंसही बोलणाऱ्याची चीनमध्ये खैर राहत नाही, हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live