भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

बीजिंग: भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या अहवालामध्ये लिहिले आहे.

भारत आणि चीनचे संबंध तणावाचे नसले तरी फार चांगले आहेत, असे देखील नाही. साधारण वर्षभरापूर्वी डोकलाम येथे दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. तेव्हा निर्माण झालेला तणाव आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. 'ग्लोबल टाईम्स'मधील अहवालानुसार चीनला भारतात रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींना मदत करण्याची गरज आहे. चीनच्या मते मोदींनी देशातील परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवावे. देशात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे मोदींना असंतोषाचा सामना करावा लागत आहे आणि ही गोष्टी चीनसाठी निश्चितपणे चांगली नाही.

भारतात केंद्र सरकार कमकूवत आहे. पण लोकसंख्येमध्ये विविधता आहे. मोदी त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी चांगली होतील, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे. जर भारताने चीनी गुंतवणुकीवर मर्यादा आणली तर रोजगार निर्मिती होणार नाही. भारताने चीनी गुंतवणुकदारांना आकर्षिक केले तर रोजगाराच्या संधी नक्की वाढतील, असे अहवालामध्ये म्हटले आहे.

WebTitle : marathi news china to help narendra modi for creating jobs in india 

संबंधित बातम्या

Saam TV Live