आकाशात दिसणार दोन-दोन चंद्र; एक दोन नव्हे तब्बल तीन चंद्र चीन अवकाशात पाठवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

लहान मुलांचा चांदोमामा आणि प्रेयसीला चांद का तुकडा म्हणणाऱ्या प्रियकरांसाठी चंद्र सखा सोबती असतो.

पण, आता याच अवकाशातल्या चंद्राला आता आव्हान मिळणार आहे. चीन आता कृत्रिम चंद्र बनवणार आहे. हो हे खरं आहे. चीनच्या शेंगडाऊ टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टम रिसर्च या संस्थेनं शेगडाऊ शहरातला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आकाशात कृत्रिम चंद्र सोडण्याचा निर्णय घेतलाय.

या कृत्रिम चंद्रामुळं 50 चौरस किलोमीटरचा भाग प्रकाशित होईल असा या संस्थेनं दावा केलाय. या चंद्रामुळं शहरातल्या स्ट्रिट लाईटची गरज उरणार नाही असा दावाही संस्थेनं केलाय. 2020 पर्यंत एक आणि 2022 पर्यंत तीन चंद्र अवकाशात सोडण्याचा त्यांचा मानस आहे. चीनच्या या कृत्रिम चंद्राच्या प्रयोगामुळं प्रदूषणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. चायना मेड चंद्रामुळं अवकाशातल्या चंद्रालाही आता स्पर्धा निर्माण झालीय. एखाद्या दिवशी तुम्ही अवकाशात जो चंद्र पाहाल तो चंद्रही मेड इन चायना असू शकतो. हा मेड इन चायना चंद्र पाहायची मानसिक तयारी आतापासूनच करा.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live