सीमेवर हल्ल्यानंतर चीनचा हा माईंडगेम

साम टीव्ही
बुधवार, 17 जून 2020
  •  सीमेवर हल्ल्यानंतर चीनचा माईंडगेम
  • व्हिडीओ प्रसिद्ध करुन दाखवली सैन्य ताकद
  • भारताकडूनही जशास तसे उत्तर

चीननं सिमेवर गद्दारी गेल्यानंतर आता भारतासोबत माईंडगेम खेळायला सुरुवात केलीय. आधी सैन्याची धमकी आणि आता एक व्हीडिओ. काय आहे हा माईंडगेम. पाहा...

लडाखच्या सीमेवर भ्याड हल्ला केल्यानंतर आता चीनी ड्रॅगननं माईंडगेम खेळायला सुरुवात केलीय. चीन गलवान खोऱ्यात कशाप्रकारे तातडीनं सैन्य कारवाई करु शकतो याचा एक व्हिडीओ चीनकडून प्रसिद्ध करण्यात आलाय. चीनचं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं हा व्हिडीओ रिट्वीट केलाय.

या व्हिडीओनंतर पंतप्रधान मोदींनीही चीनला निर्वाणीचा इशारा दिलाय.. भारत शांततापूर्ण देश आहे. पण त्याला उकसवलं तर जशास तसं उत्तर मिळेल असं मोदींनी म्हटलंय.

याशिवाय हायड्रोनज बॉम्बच्या परिक्षणाचाही एक व्हीडिओ चीनकडून जारी करण्यात आलाय.

पण, भारतही या प्रत्येक अस्राला तोड देऊ शकतो, हे चीनलाही माहित आहे. त्यामुळंच भारताकडून होणारी कारवाई थांबवण्यासाठी चीन हे उद्योग करत असल्याचं तज्ज्ञ सांगताहेत.

लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनी सैन्यानं सीमा पार करुन भारतीय सैन्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कर्नल संतोष बाबूंसह 20 जवान शहीद झाले...पण शहीद होण्याआधी भारतीय जवानांनी तब्बल 40 चीन्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याचं शौर्य काय आहे हे या वीरांनी दाखवून दिलं. त्यामुळं चीनी ड्रॅगननं आता शहाणं व्हावं. नाहीतर जितकं नुकसान भारताचं होईल, त्य़ाहून कित्येकपट नुकसान चीनला सोसावं लागेल यात शंका नाही

 


संबंधित बातम्या

Saam TV Live