चीन-पाकिस्तान मिळून भारतावर करणार जैविक हल्ला, 3 वर्षांसाठी दोन्ही देशांमध्ये गुप्त करार

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020
  • चीन-पाकिस्तान मिळून भारतावर करणार जैविक हल्ला
  • 3 वर्षांसाठी दोन्ही देशांमध्ये गुप्त करार
  • गुप्तचर यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा 

साऱ्या जगाला कोरोना संकटात लोटणारा चीन अजूनही सुधारण्याचं नाव घेत नाहीये. आता तर चीन आणि पाक मिळून भारताविरोधात जैविक हल्ल्याचा कट रचलाय. या दोन कपटी देशांनी नेमका कोणता कुटील डाव रचलाय, वाचा

कोरोना विषाणुमळे साऱ्या जगाच्या नजरेत आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या चीननं कोणताच धडा घेतलेला दिसून येत नाही. एका रिपोर्टनुसार आता याच चीननं पाकिस्तानची हातमिळवणी करून भारताविरोधात जैविक हल्ल्याचा कट रचलाय. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार यात अँथ्रेक्स सारख्या घातक संक्रमण योजनांचाही समावेश आहे. 
यासाठी दोन्ही देशांनी 3 वर्षांचा करारही केला असून चीननं पाकिस्तानी लष्कराच्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीसोबत हातमिळवणी केल्याची माहिती आहे. 

 

कधी झाला जैविक अस्त्राचा वापर ?

1939 साली जपाननं रशियाच्या पाण्यात टायफाईड व्हायरस सोडला होता तर 1980 साली इराणनं इराकविरोधात घातक रसायनांचा वापर केला. 1995 मध्ये टोकियोत मेट्रोत सरीन गॅसचा हल्ला करण्यात आला.2014 ते 2017 या काळात सीरियात मोठ्या प्रमाणात जैविक अस्त्रांचा वापर करण्यात आला. 

फायनल व्हीओ - कोरोना हे चीनचंच अपत्य आहे यावर आता पाश्चिमात्य देशांसह सर्वांनीच शिक्कमोर्तब केलंय. ज्या वुहानमधून कोरोना जगभर पसरला त्या वुहानपासून जवळ असलेल्या बीजिंग, शांघायला कोरोनाची साधी झळही पोहचली नाही. 
त्यातून जे जे देश चीनला विरोध करत आले आहेत त्या त्या देशांविरोधात चीन नेहमीच धुर्त रणनिती अवलंबत आलाय. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर चीनला पाकिस्तानची साथ आहे. त्यामुळे हे दोन देश कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. त्यामुळे भारतानही त्यांचा कुटील डाव लक्षात घेऊन..तयारी करायला हवी.


संबंधित बातम्या

Saam TV Live