CHINA VS AMERICA | चीनचा अमेरिकेवर पलटवार, 'हे' केलेत आरोप

साम टीव्ही
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोनावरुन आता चीननं अमेरिकेवर पलटवार केलाय. एड्स आणि स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला, त्यावेळी अमेरिकेला कुणी जबाबदार धरलं का? असा सवाल चीननं उपस्थित केलाय. कोरोना विषाणू चीननं पसरवल्याचं सिद्ध झालं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेनं दिला होता.

कोरोनावरुन आता चीननं अमेरिकेवर पलटवार केलाय. एड्स आणि स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला, त्यावेळी अमेरिकेला कुणी जबाबदार धरलं का? असा सवाल चीननं उपस्थित केलाय. कोरोना विषाणू चीननं पसरवल्याचं सिद्ध झालं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेनं दिला होता. याच्या तपासासाठी चीनमध्ये एक पथक पाठवण्याची तयारीही अमेरिकेनं केलीय. मात्र, या पथकाला अजूनपर्यंत चीननं परवानगी दिलेली नाही. यावरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले. आणि त्यांनी चीनला निर्वाणीचा इशारा दिला..त्यानंतर आज चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलंय.

पहाा सविस्तर व्हिडीओ-

प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, २००९ मध्ये एच1एन1फ्ल्यूचा संसर्ग झाला होता आणि जगातील २१४ देशांमध्ये तो पसरला होता. यामध्ये जगातील २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. कोणी अमेरिकेकडे नुकसानभरपाई मागितली का? 80 च्या दशकामध्ये एड्स व्हायरसचा शोध पहिल्यांदा अमेरिकेमध्ये लागला होता यानंतर हा रोग जगभरात पसरला. या रोगाने अख्ख्या जगाची चिंता वाढवली होती. कोणी अमेरिकेला जबाबदार ठरवले का? असा सवाल उपस्थित केला. 

याशिवाय 2008 च्या आर्थिक मंदीलाही चीननं अमेरिकेला दोष दिलाय. अमेरिकेतली लेहमन ब्रदर्स बँक बुडाली. आणि जगभरात मंदी आली. तेव्हा अमेरिकेकडून दंड वसुल केला का असाही सवाल चीनकडून विचारण्यात आलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live