यशस्वी होत आलेल्या लसीची चीनने केली चोरी? अमेरिकेचा चीनसह रशियावरही गंभीर आरोप

साम टीव्ही
बुधवार, 22 जुलै 2020
  • जगभरात कोरोना पसरवणारा चीन निघाला चोर
  • यशस्वी होत आलेल्या लसीची चीनने केली चोरी 
  • अमेरिकेचा चीनसह रशियावरही गंभीर आरोप

संपूर्ण जगातील संशोधक आणि संस्था कोरोनावर लस शोधण्यासाठी जंग जंग पछाडतायत. भारतासह अनेक देशांतील संशोधकांना त्यात यशही मिळू लागलंय. मात्र चीन आता संशोधक संस्थांवर सायबर हल्ला करून तयार होत असलेल्या लसींचा फॉर्म्युला चोरतंय. अमेरिकेने हा गंभीर आरोप केलाय. इतकंच नाही तर 2 चिनी हॅकर्सवर अमेरिकेने लसचोरीचा आरोप लावलाय. चीनची ही लसचोरी पाहता, भारतात लस बनवणाऱ्या संशोधक आणि संस्थांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय. कारण

चीन चोरू शकतो भारतीय लस?
भारतात एम्स, भारत बायोटेक आणि सिरम या संस्थांच्या लसींची अंतिम टप्प्यात  चाचण्या सुरू आहे. या तिन्ही संस्थांच्या लसींचे फॉर्म्युले चीन चोरू शकतं. त्यामुळे लसींबाबतची गोपनीयता आणि सुरक्षिततेवर जास्त लक्ष देण्याची गरज.

अमेरिकेने चीनवर केलेले आरोप पाहता, जगभरात कोरोनाची विषवल्ली पसरवणारा चीन आता लसींची चोरीही करू लागलाय. इतर देश बनवत असलेल्या लसींवर डल्ला मारण्याचा उद्योग चीनने सुरू केलाय. त्यामुळे भारतात लस बनवणाऱ्या संशोधकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live