कोरोनाच्या महामारीत संजीवनी ठरणाऱ्या औषधाचा कच्चा माल चीननं थांबवला...

कोरोनाच्या महामारीत संजीवनी ठरणाऱ्या औषधाचा कच्चा माल चीननं थांबवला...

कोरोनाच्या महामारीत संजीवनी ठरणारं जे औषध जगाला भारताकडून हवंय, त्याच औषधाच्या निर्मितीपुढं आता एक मोठं संकट उभं राहिलंय.


हायड्रोक्सिक्लोरोक्विन य़ा औषधासाठी लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. आणि कोरोनामुळं चीनवरुन येणाऱ्या वस्तूंवर आपण बंधणं घातलीहेत. हेच पाहता आता या औषधाचा उत्पादन करायचं कसं हा प्रश्न देशातल्या औषध कंपन्यांपुढं उभा राहिलाय...हे औषध बनवण्यासाठी अॅक्टिव फॉर्म्यास्युटीकल इंग्रेडीयंट अर्थात आयपीआर लागतं. जे फक्त ५ ते ६ कंपन्याच बनवतात. आणि हा आयपीआर बनवण्यासाठी इंटरमेडिएटची गरज भासते. जे आपण चीनकडून आयात करतो. पण आता सगळं ठप्प असल्यानं हे औषध बनवायचं कसं हा प्रश्न औषध कंपन्यांना सतावतोय.

मलेरियाच्या तापासाठी उपयुक्त असलेल्या हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाची सर्वाधिक निर्मितीबरोबरच ते निर्यात करण्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये या औषधाची निर्यात केली जाते. परंतु, हे औषध करोनासारख्या जागतिक महामारीवर दिलासादायक ठरत असल्याने अमेरिकेने या औषधाची मागणी भारताकडे केली. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषध देण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांना धमकीच्या भाषेचा वापर करावा लागला होता. अखेर अमेरिकेतील बिघडत असलेली परिस्थिती लक्षात घेऊन मोदींनी अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्यास मान्यता दिली. परंतु, सध्या भारतामधीलच हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचे उत्पादनच संकटात सापडले आहे.

हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल चीनमधून आयात करावा लागतो. परंतु, चीनमधून माल आयात करण्यावर असलेले निर्बंध व लॉकडाऊन यामुळे हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचे उत्पादन कसे करायचे, असा प्रश्न देशातील औषध कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे.

Web Title - marathi news  China stops raw materials for Hydroxychloroquine drugs ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com