संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीनचा भारताला पाठींबा ; पाकिस्तानला मोठा दणका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

न्यूयॉर्क : जगभरातून दबाव वाढत असतानाच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. सुरक्षा परिषदेत आज पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यासाठी भारताने मांडलेला जो प्रस्ताव होता त्याला चीनने पाठिंबा दिला आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे.

जगातल्या सर्व बड्या देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानची निर्भत्सना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेत आज या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. या ठरावत पाकिस्तान मदत करत असलेल्या 'जैश ए मोहोम्मद' या संघटनेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आत्तापर्यंत भारताने जेव्हा जेव्हा जैशचा प्रमुख मसूद अजहर याच्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव आणला त्या प्रत्येक वेळी चीनने त्याला विरोध केला होता. त्यामुळे चीनच्या आजच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्राची सर्वात महत्त्वाची परिषद असून निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आहेत. ज्या पाच देशांना नकाराधिकार आहे त्यात चीनचाही समावेश आहे. सुरक्षा परिषदेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची आणखी कोंडी होणार आहे.

Web Title : China Supports at UNSC bog blow for pakistan

संबंधित बातम्या

Saam TV Live