India VS China | भारतच-चीन वाद आणखी चिघळणार...

साम टीव्ही
मंगळवार, 16 जून 2020

दरम्यान चीनची राजधानी बिजींगमधून भारतावर आरोप करण्यात आलेयत. भारतीय सैन्यानं बॉर्डर पार केल्याचा चीनचा दावा आहे. भारतीय सैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याच्या उलट्या बोंबा चीनने सुरू केल्यात. संघर्षाबाबत भारतानं एकतर्फी कारवाई करू नये, असा कांगावाही करण्यास चीनने सुरूवात केलीय.

चीनसोबतचा लडाखमधील सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. काल रात्री सीमेवर झालेल्या चकमकीत एका भारतीय कर्नलसह दोन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या या घटनेमुळे तणावाचं वातावरण आहे. हा तणाव निवळण्यासाठी चीन आणि भारताचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चीन आणि भारताचे जवान आमने सामने आले. सुरूवातीला त्यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये एका अधिकाऱ्यासह अन्य दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. दरम्यान या चकमकीत चीनच्या 5 सैनिकांचा खात्मा केल्याची माहिती ग्लोबल टाईम्सने दिलीय. मात्र या चकमकीत दोन्ही बाजूकडून गोळीबार झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महत्त्वाचं म्हणजे १९६७ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये अशा पद्धतीने हिंसक चकमक झालीय. यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे.

दरम्यान चीनची राजधानी बिजींगमधून भारतावर आरोप करण्यात आलेयत. भारतीय सैन्यानं बॉर्डर पार केल्याचा चीनचा दावा आहे. भारतीय सैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याच्या उलट्या बोंबा चीनने सुरू केल्यात. संघर्षाबाबत भारतानं एकतर्फी कारवाई करू नये, असा कांगावाही करण्यास चीनने सुरूवात केलीय.

दरम्यान सोमवारी भारतीय सैन्याने दोनदा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून आणि चीनी सैनिकांवर चिथावणीखोर हल्ले केल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ग्लोबल टाईम्स या चीनच्या अधिकृत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. चकमकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारत आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झालीय.

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान संवाद सुरू झाल्याचं कळतंय. 
संघर्षाचं निराकरण करण्याबाबत चीन आणि भारताचं एकमत आहे. या चकमकीत
चीनच्या पाच सैनिकांचा खात्मा केल्याचीही माहिती चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या हवाल्याने देण्यात आलीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live