आता चिनचा ई-व्हायरस तुमच्या ऑनलाईन हालचालींवर नजर ठेवतोय

साम टीव्ही
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020
  • आता चिनी ई-व्हायरस
  • भारताच्या अर्थव्यवस्थेवर चीनची नजर
  • तुमच्या ऑनलाईन हालचालींवर ड्रॅगन नजर ठेवतोय

आता बातमी आहे, चीनने हाती घेतलेल्या ई- व्हायरस मोहिमेची. काय आहे ही चीनची मोहीम, आणि कोण आहे चीनचं नवं टार्गेट, पाहुयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट.

चिनी ड्रॅगन आधी केवळ भारतातल्या बड्या व्यक्तींवरच नजर ठेवत नाहीये. तर चीनची नजर तुमच्या आमच्या हालचालींवरही आहे. प्रामुख्याने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो सारख्या ई- कॉमर्स वेबसाईटवरून तुम्ही जी खरेदी करता, त्याची प्रत्येक अपडेट चीन घेतोय. चीनचा हा ई-व्हायरस येत्या काळात आपल्यासाठी धोक्याचा ठरु शकतोय. 

भारताच्या अर्थव्यवस्थेवर चीनची नजर

तर भारतीय संस्थांशी संबंधित माहिती मोठ्या लॉग फाईल डंपमधून काढण्यात आलेय. डेटा लीक करणाऱ्या कंपनीने त्याला ओव्हरसीझ इन्फॉरमेशन डेटाबेस असं नाव दिलंय. या डेटाबेसमध्ये एडवान्स लॅंगवेज, टार्गेटिंग आणि क्लासिफिकेशन टूल वापरले गेलेत. यात अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युएई यांचीही नोंद आहे.

एकीकडे चीन अंबानी आणि प्रेमजी यांच्या कंपन्यांचीही हेरगिरी करतंय. दुसरीकडे सर्वसामान्य भारतीयांच्या हालचालींवरही नजर ठेवतंय. एकूणच चीनचं लक्ष आहे, ते भारतीय अर्थव्यवस्थेवर. कोरोनानंतर आता चीनेने ई-व्हायरस मोहीम हाती घेतल्याचं दिसतंय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live