सुंदर महिलेच्या आडून चीनची नेपाळमध्ये 'नागीण चाल'

सुंदर महिलेच्या आडून चीनची नेपाळमध्ये 'नागीण चाल'

चीनने भारताविरोधातील कटात पाकिस्तानसोबत आता नेपाळलाही सामील केलंय. एका सुंदर महिलेला हाताशी धरून चीन नेपाळमध्ये नागिणीची चाल खेळतोय.

याच सुंदर महिलेनं नेपाळमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडवलीय. या सुंदर महिलेची नेपाळचे पंतप्रधान, बडे नेते, मंत्र्यांसोबत या महिलेची उठबस सुरूय. या सुंदर चेहर्‍यामागे दडलंय चीनचा कुटील डाव. या सुंदर महिलेचं नाव होऊ यांकी ती सध्या चीनची नेपाळमध्ये राजदूत आहे. इंटरनॅशनल मीडियाच्या दाव्यानुसार, नेपाळच्या राजकारणात सुरू असलेल्या तणावात यांकीनं एका भेटीत सर्वांना शांत केलंय असा दावा केला जातोय. यांकी आणि नेपाळचे पंतप्रधान यांची वाढती जवळीक पाहता नेपाळमध्ये तणवाचं वातावरण निर्माण झालंय. या फोटोत होऊ यांकी नेपाळचे माजी पंतप्रधान प्रचंड यांच्यासोबत चर्चा करताना दिसतेय. राजकीय तणावानंतर प्रचंड यांनीही पंतप्रधान के. पी. ओलींच्या विरोधात मोर्चा वळवलाय...

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्यासोबत यांकीची 3 जुलैला जवळपास 1 तास चर्चा झाली. आणि ती सध्या ऑपरेशन नेपाळवर काम करतेय.

चीनची राजदूत थेट नेपाळच्या राजकारणात ढवळाढवळ करत असल्याने सत्तासंघर्ष पेटलाय. यातच कम्युनिस्ट पार्टीतही यांकाचा महत्त्वाचा रोल असल्याचंही बोललं जातंय. एवढे अधिकार या राजदूत महिलेला दिले कुणी? विशेष म्हणजे, यांकीने  चीनच्या संस्कृतीचा अभ्यास केलाय. यांकीला एका राजकीय नेत्याप्रमाणे चीनने तिला नेपाळची राजदूत बनवलीय. यांकीने नेपाळच्या परंपरेचा अभ्यास करून नेपाळी नेत्यांनाही भूरळ पाडतेय.

काही दिवसांपूर्वी यांकीने नेपाळी हॅरिटेज स्थळांवर जाऊन फोटोसेशन केलं होतं. चीन आणि नेपाळचे संबंध किती चांगले आहेत असाच संदेश या फोटोतून तिला द्यायचा होता. असा सर्व अभ्यास करून यांकीनं नेपाळशी घनिष्ठ संबंध ठेवलेत.सुंदर चेहर्‍याआडून चीनची नेपाळवर सुरू असलेली नागीण चाल यशस्वी झाल्याचं बोललं जातंय. पण ही यांकी आहे तरी कोण पाहुयात...

कोण आहे होऊ यांकी? 

  • 1998 ते 2001 पर्यंत यांकी पाकिस्तानमध्ये थर्ड सेक्रेटरी होती
  • चीन आणि आशियातील घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणारी अधिकारी म्हणून काम
  • 2018 पासून नेपाळमध्ये चीनची राजदूत म्हणून कार्यरत 
  • होऊ यांकाचं हिंदी, ऊर्दू, नेपाळी, इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे 

सध्याच्या घडामोडी पाहता, यांकीला नेपाळमध्ये राजदूत म्हणून तैनात करून भारताविरोधात तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याची चाल चीनची आहे... त्यावरही ती यशस्वी झालीय. पण, हे असंच सुरू राहिलं तर चीनची सुंदर महिला नागीण चाल खेळून एक दिवस नेपाळलाही डसेल. त्याआधीच नेपाळनं सावध व्हायला हवं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com