चिपळुणमध्ये एका आठवड्यात 34 ठिकाणी घरफोड्या

इंद्रजित काटकर, पोलिस निरीक्षक, चिपळूण
शुक्रवार, 11 मे 2018

चिपळूण - शहरात एका आठवड्यात 34 ठिकाणी चोर्‍या झाल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे. यातील एकाही चोरीचा उलगडा लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्येही संतापाची लाट आहे. गस्तीचे पोलीस नेमके काय करतात, असा सवाल नागरिकांतून होत आहे. 

येथे सलग दोन दिवस घरफोडी झाल्या. त्या शहराच्या उपनगरातच झाल्या. पहिल्या दिवशी पेठमाप आणि भेंडीनाका परिसरात तर दुसर्‍या दिवशी पुन्हा पेठमाप आणि कापसाळ येथे घरफोडी झाली. हे चोरटे परिसरातील एका इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. त्यांना औदुंबर सोसायटीच्या परिसरात काही तरूणांनी पाहिले आहे.

दुसर्‍या दिवशी चोरी करून परतत असताना पोलिसांनी त्यांना पाहिले. दुसर्‍या दिवशी चोरी करून परतत असताना ते कापसाळ येथे गस्तीच्या पोलीस व्हॅन समोर आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकी थांबवायलाही सांगितले. मात्र दोघेही दुचाकी टाकून जंगलाच्या दिशेने निघून गेले. गुरूवारी दिवसभर त्यांच्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आला. मात्र चोरटे हाती लागले नाहीत.

चोरटे स्थानिक असल्याचा संशय

उन्हाळी सुट्टीनिमित्त शहरातील नागरिक मूळ गावी जातात. याचाच फायदा घेवून चोरटे सक्रीय झाले आहेत. चोरट्यांनी बंदस्थितीत असलेल्या सदनिका व बंगले फोडले आहेत. त्यामुळे ते स्थानिक असल्याचा संशय आहे. 

गुरुवारी पुन्हा रत्नागिरी येथून श्वान व ठसेतज्ञांना बोलावण्यात आले आहे. रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर माहितीच्या आधारे चोरांचा तपास सुरू आहे. लवकरच ते मिळतील. नागरिकांनी घर बंद करून जाण्यापूर्वी त्याची माहिती नागरिकांना द्यावी. बाहेर जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये. 

संबंधित बातम्या

Saam TV Live