महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना अतिशय निंदनीय : चित्रा वाघ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे : नगर जिल्ह्यात आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना अतिशय निंदनीय व धक्कादायक आहे. महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबताना दिसत नाही. पतीला वाचविणाऱ्या पत्नीला विवस्त्र करून मारण्यात आली यामुळे कोठेही भिती, धाक राहिला नाही असे दिसते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आणि प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. 

चित्रा वाघ म्हणाल्या, की एवढे सगळे होऊनही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. आरोपी न्यायालयाकडून जामीन मिळवितात. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्न निर्माण होतात. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम असून, महिला अत्याचाराला बळी पडत आहेत. यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याची समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

WebTitle : marathi news chitra wagh on horrifying incident of srigonda ahemadnagar 

संबंधित बातम्या

Saam TV Live