राजस्थान सभेतील उपस्थित नागरिकांकडून मोदी, मोदींचा घोष

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

चुरू : भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले असताना, चुरुमधील सभेत उपस्थित नागरिकांकडून मोदी, मोदीच्या घोषणांना परिसर दणाणून गेला होता. 

मोदींनी नुकतेच भारतीय लष्कर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला कोठे, कसा आणि कधी घेईल हे ठरवेल असे म्हटले होते. त्यानुसार भारतीय लष्कराने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करत 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्यानंतर प्रथमच मोदी सभेच्या माध्यमातून संबोधित होते. या सभेत मोदींनी हल्ल्याचा उल्लेख करत भारतीय लष्कराला नमन केले.

देशापेक्षा मोठे काहीच असू शकत नाही. याच भावनेने आम्ही काम करत आहोत. प्रधानसेवक आपले काम करत आहे, असे मोदींनी म्हटले आहे. यावेळी मोदींनी 2014 मध्ये केलेल्या कवितेची आठवण करून दिली. यावेळी मोदींनी देश सुरक्षित हातात असल्याची आठवण करून देताच उपस्थितांमध्ये जल्लोष पसरला.

Web Title: Churu citizens chants Modi Modi in his rally after the attack of Indian Air Force

संबंधित बातम्या

Saam TV Live