आज निघणार सिडकोच्या 15 हजार घरांसाठीची लॉटरी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सिडकोच्या माध्यमातून सुमारे 15 हजार घरांसाठी आज  जम्बो लॉटरी निघणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन नोंदणी सोमवारपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. या जम्बो लॉटरी साठी 15 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होईल. ही घरं  नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत. या घरांची लॉटरी २ ऑक्टोबर रोजी काढण्यात येईल.

दरम्यान, एमएमआरडीए भागात म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या भागात ज्यांच्या नावावर घरं आहेत त्यांना मात्र या घरांचा लाभ घेता येणार नाही.

अधिक माहितीसाठी सिडको ची वेबसाईट https://lottery.cidcoindia.com/App/ वर भेट द्या  

WebTitle : marathi news CIDCO navi mumbai affordable housing 

संबंधित बातम्या

Saam TV Live