खुशखबर ! सिडकोची ऑगस्ट महिन्यात 90 हजार घरांची लॉटरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जून 2019

घरांच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडको ऑगस्ट महिन्यात 90 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सिडकोची सोडत लांबणीवर गेली होती. अखेर या सोडतीला मुहूर्त मिळालाय. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी सिडकोने १४ हजार ७३८ घरांची लॉटरी काढली होती. या घरांची विक्रीही त्याच दिवशी सुरू होण्याची शक्यता आहे. 

नवी मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानके आणि ट्रक टर्मिनल्स यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांवर यातील काही घरे बांधली जाणार आहेत. या योजनेतील ३५ टक्के घरे ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. सिडकोच्या गेल्या वर्षीच्या मध्यमगृहनिर्मिती योजनेतील घरांची कमी १६ लाख तर जास्तीत जास्त तीस लाखांपर्यंत किमतीची होती. 

सिडकोच्या घरांची किंमत ही तत्कालीन बाजार भावाप्रमाणे त्यांचा अर्थविभाग निश्चित करीत असल्याने अल्प आणि दुर्बल घटकासाठी असलेल्या घरांची किंमतही जवळपास गेल्या वर्षी इतकीच राहण्याची शक्यता आहे.

WebTitle : marathi news cidco to open draws of 90 thousand houses in new mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live