पुणेकरांना शहरातील १५० ठिकाणी मोफत 'वायफाय' सेवा, पण....

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 जानेवारी 2018

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणेकरांना शहरातील १५० ठिकाणी मोफत 'वायफाय' सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका दिवसाला एक व्यक्ती फक्त ५० एमबी डेटाच वापरु शकतो. त्यामुळे ही मोफत वायफाय सेवा एक दिवस तर सोडाच पण एक तास तरी पुरेल का, यावर शंका उपस्थित केली जातेय. शहरातील निवडक उद्यानं, हॉस्पिटल, पोलिस स्टेशन याबरोबरच महापालिकेची मुख्य इमारत, सरकारी कार्यालयं, संग्रहालयं अशा विविध ठिकाणी वायफाय सुविधा दिली जाणारे. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणेकरांना शहरातील १५० ठिकाणी मोफत 'वायफाय' सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका दिवसाला एक व्यक्ती फक्त ५० एमबी डेटाच वापरु शकतो. त्यामुळे ही मोफत वायफाय सेवा एक दिवस तर सोडाच पण एक तास तरी पुरेल का, यावर शंका उपस्थित केली जातेय. शहरातील निवडक उद्यानं, हॉस्पिटल, पोलिस स्टेशन याबरोबरच महापालिकेची मुख्य इमारत, सरकारी कार्यालयं, संग्रहालयं अशा विविध ठिकाणी वायफाय सुविधा दिली जाणारे. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती डिजिटल साक्षर व्हावी, या उद्देशाने पालिकेने अनेक उपक्रम हाती घेतलंय. सुरक्षिततेसाठी काही वेबसाइट ब्लॉकदेखील करण्यात आल्या आहेत. स्मार्ट मोबाइल फोनबरोबरच लॅपटॉपच्या माध्यमातूनही हे मोफत वायफाय मिळणार असल्याचे जगताप यांनी सांगितलं.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live