पेनकिलर नव्हे मृत्यूचा शॉर्टकट; ठाणेकर पेनकिलरच्या आहारी

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018
  • पेनकिलर सातत्यानं घेतल्यानं आतड्यांवर परिणाम होतो. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रूग्णांनी पेनकिलर घेणं धोकादायक आहे.
  • पेनकिलरमुळे किडनी निकामी होण्याचा धोका आहे.

डोकं दुखी, पोटदुखी किंवा दाढदुखीवर रामबाण उपाय म्हणून पेनकिलरकडं पाहिलं जातं. छोट्या मोठ्या दुखण्यावर पेनकिलर हा उपाय म्हणून शोधला जातो. पण वेदनेवरच्या शॉर्टकटची ठाणेकरांना सवय लागलीय. सवय म्हणण्यापेक्षा पेनकिलरची ठाणेकरांना व्यसन लागलंय. लाखो ठाणेकरांपेक्षा निम्मे ठाणेकर वेदनेवरचा उपाय म्हणून वेदनाशामक असलेली पेनकिलर घेतात.

पेनकिलरचा शॉर्टकट मृत्यूचाही शॉर्टकट होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेताना तुम्ही एक पाऊल मृत्यूजवळ टाकलेलं असतं.

  • पेनकिलर सातत्यानं घेतल्यानं आतड्यांवर परिणाम होतो. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रूग्णांनी पेनकिलर घेणं धोकादायक आहे.
  • पेनकिलरमुळे किडनी निकामी होण्याचा धोका आहे.

त्यामुळं वेदना निवारणासाठी शॉर्टकट निवडू नका. पेनकिलरपासून लांब रहा असाच सल्ला तज्ज्ञ देतायत.

WebLink : marathi news citizens of thane has habbit of eating painkiller 


संबंधित बातम्या

Saam TV Live