लोकसभेतील खडाजंगीनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवणार

लोकसभेतील खडाजंगीनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवणार

नवी दिल्ली : 6 दशकांपासून लागू असलेल्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्तीचे विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं. गृहमंत्री अमित शहांनी हे बिल लोकसभेत मांडलं .त्यावेळी विरोधकांनी मोठा गोंधळ केला. यासाठी सत्ताधारी भाजपाने आपल्या खासदारांना 3 दिवसांसाठी व्हिप जारी केलाय. यावेळी विधेयक मांडण्याच्या बाजूनं 293 मतं पडली. तर विधेयकाच्या विरोधात 82 मतं पडली. त्यामुळं आता हे विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवलं जाणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 2014 पूर्वी भारतात स्थलांतरित नागरिकांना या बिलातून दिलासा मिळाला आहे. हे विधेयक अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर हे विधेयक अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय.

बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक आज, लोकसभेत सादर झाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली होती. विधेयकाला काँग्रेससह डावे, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांनी विरोध केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात चर्चा करण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय. पण, काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेस नेत्यांनी सभागृहात गोंधळ घातला. मुख्यत्वे मुस्लिमांना वगळून शेजारच्या देशांतून आलेल्या इतर शरणार्थींना भारतीयत्व बहाल करणारे नागरिकत्व संशोधन विधेयक-2019 गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत म्हणजे लोकसभेत पहिल्याच दिवशी मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयकावर चर्चा सुरू झाली. 

राज्यसभेत बुधवारी येणार विरोधक
राज्यसभेत ते विधेयक बुधवारी येऊ शकते, असे सरकारच्या गोटातून सांगण्यात आले. कॉंग्रेससह विरोधी पक्षांचा या विधेयकाला कडाडून विरोध आहे. केंद्र सरकारकडे वरिष्ठ सभागृहात बहुमतात नाही व शिवसेना आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने याला अगोदरच विरोध केलेला आहे. बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती, अण्णा द्रमुक यांसारख्या मित्र पक्षांच्या साथीने विधेयक मंजूर करण्याची सरकारची रणनीती आहे.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

काय आहे विधेयक?

  • पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशातील अल्पसंख्यांना मिळणार भारतीय नागरिकत्व
  • सहा अल्पसंख्याक समूहांना भारतीय नागरिकत्वाचा अधिकार
  • मुस्लिम समुदायाचा या समूहांमध्ये समावेश नाही 
  • सहा वर्षे भारतात वास्तव्य केल्यास आणि अत्यावश्यक कागदपत्रं सादर केल्यास मिळणार भारतीय नागरिकत्व
  • नागरिकत्व मिळेपर्यंत दीर्घकाळ व्हीसाच्या साह्याने भारतात राहता येणार
     


फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

Web Title: Union Home Minister Amit Shah tables Citizenship Amendment Bill in Lok Sabha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com