भारतात असणारी अयोध्या नगरी खोटी? प्रभू श्रीरामाचा जन्म नेपाळमधला?

साम टीव्ही
मंगळवार, 14 जुलै 2020
  •  
  • भारतात असणारी अयोध्या नगरी खोटी ?
  • प्रभू श्रीरामाचा जन्म नेपाळमधला ?
  • कुणी म्हटलं अयोध्येला नकली-नगरी ?

भारतातील अयोध्या नगरी खोटी आहे. रामाचा जन्म भारतात झालाच नव्हता. अशी भडकाऊ विधानं करण्यात आलीयत. प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान अयोध्या नगरी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. नेपाळचे पंतप्रधान ओपी शर्मा ओलींनी काही मुक्ताफळं उधळलीयेत. भारतात असणारी अयोध्या नगरी नकली आहे असं म्हणण्यापर्यंत ओलींची मजल गेलीय.

काय म्हणाले नेपाळी पंतप्रधान ? 
 
भारतातली अयोध्या नगरी ही प्रभू श्रीरामांचं जन्मस्थान नाहीच तर नेपाळच्या वाल्मिकी आश्रमाच्या जवळ प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान आहे, सीतामातेचा विवाह झालेला राम नेपाळी होता. नेपाळमधल्या बीरगंज प्रदेशाजवळ ठोरी नावाच्या ठिकाणी वाल्मिकी आश्रम आहे, तिथले राजकुमार प्रभू श्रीराम होते, अशी मुक्ताफळं ओपी शर्मा ओलींनी उधळलीयेत.

ओलींच्या मुक्ताफळांवर संपूर्ण भारतातून संताप व्यक्त होतोय. राम मंदिर ट्रस्ट नेपाळी पंतप्रधान ओलींविरोधात आक्रमक झालीय.

नेपाळ अनेक दिवसांपासून भारताला वाकुल्या दाखवतोय. कधी चीनचं अप्रत्यक्ष समर्थन करत तर कधी भारतीय भूभाग नेपाळी नकाशा दाखवत. आता तर कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू-श्रीरामांवरच नेपाळी पंतप्रधानांनी दावा ठोकलाय. नेपाळच्या या उचापतींकडे अजिबात दुर्लक्ष करुन चालणार नाही


संबंधित बातम्या

Saam TV Live