सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध.. सहा महिन्यात फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

भारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातलेत. यानुसार खातेदारांना सहा महिन्यात फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत. या निर्णयांनंतर टी को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतल्या बोरीवल्या शांतीवन शाखेबाहेर गोंधळ घातला. रिझर्व्ह बँकेने 17 एप्रिलला सिटी बँकेला पत्र पाठवून ठेवी घेण्यास आणि कर्ज द्यायला मनाई केलीय. या सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी आता रिझर्व्ह बँकेची लेखी परवानगीची आवश्यकता असेल. या बँकेच्या अध्यक्ष पदावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ हे आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातलेत. यानुसार खातेदारांना सहा महिन्यात फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत. या निर्णयांनंतर टी को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतल्या बोरीवल्या शांतीवन शाखेबाहेर गोंधळ घातला. रिझर्व्ह बँकेने 17 एप्रिलला सिटी बँकेला पत्र पाठवून ठेवी घेण्यास आणि कर्ज द्यायला मनाई केलीय. या सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी आता रिझर्व्ह बँकेची लेखी परवानगीची आवश्यकता असेल. या बँकेच्या अध्यक्ष पदावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ हे आहेत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, त्यासोबतच लग्न समारंभ यासाठी लागणारी 50 हजारापर्यंत रक्कम बँकेकडून रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने मिळणार आहेत. बँकेवर निर्बंध जरी लागले तरी ठेवीदारांनी बँकेवर विश्वस ठेवावा. त्यांचे पैसे सुरक्षित असून बँकेचं विलिनीकरण झाल्यानंतर हा तिढा सुटेल, असा विश्वास बँकेने व्यक्त केलाय. तसंच बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी  ई व्यवहार बंद राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live