नाना पाटेकरांसह पोलिसही भ्रष्ट - तनुश्री दत्ता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

मी टु आरोपांवरून वादात सापडलेल्या नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी तनुश्रीच्या तक्रारीसंदर्भात नानापाटेकर यांच्याविरोधात पुरावा न सापडल्याचा चौकशी अहवाल दंडाधिकारी न्यायालयात दिला आहे. पोलिसांच्या तपासावरून तनुश्रीनं नाराजी दर्शवली आहे. भ्रष्ट पोलिस आणि भ्रष्ट कायदे व्यवस्थेकडून अतिभ्रष्ट नानांना क्लीनचीट दिल्याचं म्हणत तनुश्रीनं नाराजी व्यक्त केली आहे. 

भ्रष्ट पोलिस आणि भ्रष्ट कायदा व्यवस्थेकडून अतिभ्रष्ट नाना पाटेकर यांना क्लीनचीट दिली गेलीय ज्यांच्याविरोधात पूर्वीही  अनेक महिलांनी गैरवर्तणुक केल्याची तक्रारी दाखल केलीये, अशी प्रतिक्रिया तनुश्रीनं दिली आहे. 

तनुश्रीशीचे वकील  नितिन सातपुते यांनी देखील पोलीस तपासासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. नाना पाटेकरांना वाचवण्यासाठी पोलिसांनी तनुश्री दत्ता प्रकरणातील तपासाकडे दुर्लक्ष केलं असा आरोप तनुश्रीच्या वकिलांनी केला आहे. पोलिसांनी चौकशी अहवाल सादर केला तरी तो अंतिम होत नाही. आम्ही पुन्हा पोलिसांना या प्रकरणाचा तपास करायला सांगू शकतो. पोलिसांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे त्यांना नाना पाटेकर यांना वाचवायचे होते', असा आरोप नितिन यांनी केला.

२०१८ मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर  गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये लेखी तक्रारही केली होती.  मात्र तनुश्रीनं दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावा न सापडल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयाला दिला आहे. 

web title: Clean chit to corrupt nana by the corrupt police - tanushri datta 

संबंधित बातम्या

Saam TV Live