आता मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनीधींच्या वेतनात कपात केली जाणार...

साम टीव्ही
मंगळवार, 31 मार्च 2020

कोरोना व्हायरसमुळे मोठी ंमंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय मंडळीच्या पगारात कपात होणार आहे. मुंख्यामंत्री, आमदार, खासदार यांचे वेतन कापले जाईल.

कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. तसंच शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन मिळणार आहे..कोरोनामुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात घट झालीय..त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

या व्हिडीओमधून सविस्तर पाहा. कोणाचे किती वेतन कापले

WEb Title - cm and all leaders payent will be cut due to corona virus effect on economy

 


संबंधित बातम्या

Saam TV Live