मुख्यमंत्री आणि नारायण राणेंच्या बैठकीला आलेल्या समन्वयकांची नावं गुप्त का ठेवण्यात आली?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 जुलै 2018

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. मात्र या बैठकीला आलेल्या समन्वयकांची नावं गुप्त ठेवण्यात आली.

सुरक्षेच्या दृष्टीने ही नावं गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ज्यांना या प्रतिनिधींची नावं हवी आहेत त्यांनी शासनाकडे मागणी करावी असं यावेळी सांगण्यात आलं.पत्रकारांनाही या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मराठा समाजाच्या नेमक्या कोणत्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आलं होतं याबाबत चर्चांना उधाण आलंय.

आंदोलनाचा इशारा देणाऱ्या एकाही प्रतिनिधीची उपस्थिती या बैठकीला नव्हती अशी माहिती मिळतेय. त्यामुळं या बैठकीबद्दल संभ्रमाचं वातावरण तयार झालंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live