आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद ? खरंच आदित्य ठाकरेंसाठी मुख्यमंत्री उत्सुक?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवलीय, अशी जोरदार चर्चा आता सुरू आहे. इतकंच काय ते सरकारचा भाग झाले तर आवडेल, असं वक्तव्यही मुख्यमंत्र्यांनी केल्याचं बोललं जातंय. त्यासाठी हवाला दिला जातोय, मुख्यमंत्र्यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीचा.

मुलाखतीतल्या वक्तव्यांवरून राजकीय चर्चांना लागलीच उधाण आलं. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य म्हणजे शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे दस्तुरखुद्द आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढण्यासाठी चाचपणी सुरू केलीय. त्यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाल्या असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी मात्र, त्या वक्तव्यांपासून फारकत घेतलीय.

आता प्रश्न निर्माण होतो की मुख्यमंत्र्यांच्या नावानं चर्चेत असलेलं पहिलं विधान खरं की त्यावर केलेला खुलासा खरा.

WebTitle : marathi news CM devendra fadanvis on aaditya thackeray as DCM of maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live