मुख्यमंत्री फडणवीस निवडणुकांपूर्वी पिंजून काढणार महाराष्ट्र

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांकडून दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. त्यानंतर आता भाजपकडून 'महाजनादेश यात्रा' काढण्यात येणार आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर ही यात्रा पार पडणार आहे. या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते महिनाभर दौऱ्यावरच असणार आहेत. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांकडून दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. त्यानंतर आता भाजपकडून 'महाजनादेश यात्रा' काढण्यात येणार आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर ही यात्रा पार पडणार आहे. या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते महिनाभर दौऱ्यावरच असणार आहेत. 

शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात 'जनआशीर्वाद' यात्रा नुकतीच काढली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असून, ती जळगाव येथून सुरू झाली. आदित्य ठाकरे युवकांसोबतच शेतकऱ्यांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व जनतेच्या मनावर बिंबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी चा भाजपचा रोडमॅप 

 • जनादेश यात्रा : 30 जिल्हे, 25 दिवस, 4 हजार 232 किलोमीटर अंतर,152 विधानसभा क्षेत्र, 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा 
 • 21 जुलै 2019 - प्रदेश विस्तारित कार्यसमिती 
 • 25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 - जिल्हयासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक 
 • 9 ऑगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह 
 • 1 जुलै ते 15 ऑगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा) 
 • 5 जुलै ते 15 ऑगस्ट - पक्ष विस्तार योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत) 
 • 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट - विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन 
 • 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन) 
 • 16 ऑगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम 
 • 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट - महाजनादेश यात्रा 
 • 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम 
 • 16 ऑगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)

संबंधित बातम्या

Saam TV Live