VoteKar_Maharashtra | मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केलं मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले. यावेळी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्रात लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव सुरू आहे. मी सहकुटुंब मतदान केलंय. जनतेला आवाहन आहे की त्यांनी मतदान करावं. सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आकांक्षा असतात. त्यासाठी मतदान केलंच पाहिजे. अपेक्षा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडावं.' आचारसंहिता आहे. मतदान सुरू आहे. त्यामुळे मला पक्षाचं धोरण आणि जाहीरनामा याविषयी काही बोलता येणार नाही. आचारसंहिता भंग होईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या आशीष देशमुख यांचे कडवे आव्हान आहे. 

Web Title: CM Devendra Fadnavis cast vote in Nagpur

संबंधित बातम्या

Saam TV Live