नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे रेल्वे इंजिन भाड्याने घेतले आहे. गल्लीतही हे इंजिन शिल्लक राहिलेले नाही. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले असून, त्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याचा आज (शनिवार) प्रचाराची अखेर होत आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. या सभेत त्यांना शरद पवार, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले :
- निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर
- राष्ट्रवादीचे कॅप्टन यांना लढण्यासाठी मैदानात उतरण्याआधीच मैदान सोडावे लागले.
- भाड्यानं हे वक्ते आणतात
- शरद पवार यांनी रेल्वे इंजिनच भाड्यानं घेतले
- गल्लीतही शिल्लक नसलेलं हे इंजिन आहे
- नोटाबंदीने राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले म्हणून जळफळाट
- सरकारने दिलेल्या पैश्यांवर नाशिकचा विकास झाला
- कुंभमेळ्यासाठी पैसा द्यायला राज ठाकरे यांच्या महापालिकेनं दिला नाही
- हा पैसा सरकारचा, राज्यातील जनतेचा
- गेल्या 2 वर्षात 2 हजार कोटींची कामे सुरू केली आहे
- इंजिन हलत नाही, चालत नाही, डुलत नाही अशी अवस्था आता राष्ट्रवादीची होणार आहे
- भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला, तिजोऱ्या लुटल्या म्हणून जेलमध्ये टाकले
- आगे आगे देखो होता है क्या, लवकरच सुरू होणार खटला
- न्यायदेवताच त्यांच्या पापांचा करणार फैसला
-  बालाकोटमध्ये सैनिकांनी केलेल्या कारवाईबद्दल राज ठाकरे यांची टीका म्हणजे सैनिकांवर संशय
- 124 अ कलम रद्द करायचं हे काँग्रेस म्हणते, देशद्रोह्यांना चाप बसवणारे हे कलम आहे
- देश वाचवण्यासाठी मोदींना बळ द्या

Web Title: CM Devendra Fadnavis targets MNS chief Raj Thackeray in Nashik

संबंधित बातम्या

Saam TV Live