VIDEO | ओल्या दुष्काळावर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. महाराष्ट्रातून पाऊस जाण्याचं काही नाव घेत नाहीये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करायला लागतंय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय.

अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. महाराष्ट्रातून पाऊस जाण्याचं काही नाव घेत नाहीये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करायला लागतंय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय.

मोबईलवरून फोटो अपलोड करण्याची मुभा सरकाने शेतकर्यांना दिली आहे. त्याचसोबत ज्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत त्यांनीही काळजी करू नये. नुकसान झालेल्या सर्वांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. सरकारने केलेले पंचनामे खासगी विमा कंपन्या ग्राह्य धरणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय  

कुठे किती नुकसान : 
नाशिक जिल्ह्यात ५२ तालुक्यांमध्ये १६ लाख हेक्टरवर नुकसान झालंय. 
पुणे जिल्ह्यात ५१ तालुक्यांमध्ये १ लाख ३६ हजार हेक्टर नुकसान  
औरंगाबाद जिल्हा सर्वात जास्त बाधित झालाय. यातील ७२ तालुक्यांमध्ये २२ लाख हेक्टरवर नुकसान झालंय.  
अमरावती जिल्ह्यात ५६ तालुक्यांमध्ये १२ लाख हेक्टरवर नुकसान झालंय. 
नागपूरमध्ये ४८ तालुक्यांमध्ये ४० हजार हेक्टरवर नुकसान झालंय.   
कोणत्या पिकांचं किती हेक्टरवर नुकसान : 
सोयाबीन शेतीचं १८ ते १९ लाख हेक्टरवर नुकसान 
कापूस शेतीचं १९ लाख हेक्टरवर नुकसान  
मका शेतीचं ५ लाख हेक्टरवर नुकसान  
ज्वारी  शेतीचं २ लाख हजार हेक्टरवर नुकसान झालंय 
बाजरी शेतीचं २ लाख हजार हेक्टरवर नुकसान झालंय
भात शेतीचं १ लाख ४४ हजार हेक्टरवर नुकसान झालंय 
फळ पिकांचं ५३ हजार हेक्टरवर नुकसान झालंय 
दरम्यान नुकसानभरपाई साठी राज्य सरकारने केंद्राकडे देखील मदत मागितली आहे. पुढील आठवड्यात मदतकार्य गतिमान होईल. सर्व विभागीय जिल्हाधिकार्यांना आणि आयुक्तांना याबाबतचे आदेश देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय.    

WebTitle : cm fadanavis on un seasonal rain relief by government
 


संबंधित बातम्या

Saam TV Live