राज्यात दुष्काळस्थिती असताना जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा 

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

राज्यातली पीकस्थिती भीषण असल्याचं वास्तव मान्य करतानाच दुष्काळ जाहीर करण्यासाठी डिसेंबर उजाडणार असल्याची माहिती मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी दिली.

केंद्राने ठरवून दिलेले निकष पूर्ण करण्‍यासाठी वेळ लागणार असल्‍याचं सांगतानाच टंचाईची स्थिती 31 ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर केली जाईल, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केलं. अमरावती जिल्‍हयातल्या विविध योजनांच्‍या यशापयशाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

राज्‍यात यावेळी सरासरी 78 टक्केच पाऊस झाल्‍यानं ही स्थिती निर्माण झाल्‍याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 2016 पासून दुष्काळ जाहीर करण्‍याच्‍या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याने दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला उशीर लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

89 पैकी अवघ्या 13 महसूल मंडळांमध्येच शंभर टक्के पाऊस झाला असला.. तरी राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live