आमचं सरकारच मराठा आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास  

आमचं सरकारच मराठा आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास  

कोल्हापूर- आमचं सरकारच मराठा आरक्षण देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणासाठी पाहिजे तर आजच अध्यादेश काढू शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नाही, आणि आम्हाला मराठा समाजाला फसवायचं नाही, मराठा समाजाला आरक्षण तर द्यायचेच आहे पण ते टिकवायचेही असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू असा विश्वासही व्यक्त केला.

आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर बाबी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. काही लोक या आरक्षणाच्या मुद्याला जाणीवपूर्वक चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, पण ज्यांना आरक्षण कुठल्या पद्धतीने द्यायला हवे आहे हे कळत नाही त्यांना निश्चित भविष्यात हे कळेल की आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे असंही ते यावेळी म्हणाले. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र स्वातंत्र्योत्तर काळात ते निघून गेलं. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र कोर्टाने स्थगिती आणली, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईतल्या राजाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. काही लोक म्हणतात की, आरक्षणाचा अध्यादेश काढा, परंतु त्यामधील कायदेशीर बाबीवर त्यांनी आज पुन्हा बोट ठेवले. 
त्याचबरोबर, राजाराम महाराजांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विसाव्या शतकात अधुनिक महाराष्ट्राची मुहूर्तमेढ राजाराम महाराजांनी रोवली. राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा विचार राजाराम महाराजांनी कायम केला. तसेच, शिवस्मारकाच्या उंचीवरून केलेले राजकारण हे दुर्दैवी आहे. शिवस्मारक हे जगातले सर्वात मोठे स्मारक असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com