मला तर Z प्लस सुरक्षा आहे, मला कुणी हात पण नाही लावू शकत - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा समाजानं दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या पूजेला पंढरपूरला न येण्याचा निर्णय घेतलाय. पंढरपुरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि त्याचा वारकऱ्यांना फटका बसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय. 

महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार नाहीत. वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतलाय. 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न असून,  विठ्ठलाची पूजा मी घरीही करु शकतो  असेही मुख्यमंत्री म्हणाले.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live