नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी - सामना

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. नक्षलींचा मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट होता, लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, त्यांना उदंड, निरोगी, दिर्घायुष्य लाभो अशी सदिच्छाही सामनातून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांनी भीमा–कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी–फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. नक्षलींचा मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट होता, लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, त्यांना उदंड, निरोगी, दिर्घायुष्य लाभो अशी सदिच्छाही सामनातून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांनी भीमा–कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी–फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live