ठाकरे सरकार देणार आणखी एक दणका; ऍक्सिस बँकचं अकाऊंट बंद?

Uddhav Thackeray, amruta Fadnavis, Axis Bank
Uddhav Thackeray, amruta Fadnavis, Axis Bank

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार घालवून सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आणखी एक दणका देत ऍक्सिस बँकेतील खाती बंद करण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बँकेत कार्यरत असल्याने वाद झाले होते.

'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील सत्ताबदलाचा थेट फटका ‘ऍक्सिस बँके’सारख्या खाजगी क्षेत्रातील बँकेला बसणार आहे. ऍक्सिस बँक ही देशातील पहिल्या पाच प्रमुख बँकांपैकी आहे. महाराष्ट्रातील पोलिस दलाचे वेतन या बँकेमध्ये जमा होते. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात आली होती. अमृता फडणवीस या याच बँकेत कार्यरत असल्याने ऍक्सिस बँकेत खाती वळविण्यात आल्याचा आरोप केला होता. यावरून बराच वादही झाला होता. 

ऍक्सिस बँकेत जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती.

महिनाअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. या विस्तारानंतर खातेवाटप होणार आहे. केवळ राष्ट्रीयकृत बँकांद्वारे वेतन आणि अनुदान वितरणाच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले आहे. 

Web Title: CM Uddhav Thackeray-led government may be decision to closed Axis Bank accounts
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com