कोरोना पसारवणाऱ्या नोटांना आणि फळांना थुंकी लावणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री

मोहिनी सोनार
शनिवार, 4 एप्रिल 2020
  • कोरोना पसारवणाऱ्या नोटांना आणि फळांना थुंकी लावणाऱ्यांना सोडणार नाही*
  •  
  • *कोरोनपासून मी वाचवेन पण यांना कायद्यापासून कोणी वाचवू शकणार नाही- उद्धव ठाकरे*
  • *राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचा इशारा*

महाराष्ट्राला कोरोनाचा अक्षरशः विळखा पडलाय. हा विळखा इतका भयंकर होत चाललाय की, प्रशासनही हतबल होताना पाहायला मिळतंय. त्यातच आता इतर देशांनीही कोरोनपुढं  हात टेकलेत. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनाही कोरोनावर अजून उपाय सापडत नाही. महाराष्ट्रात कोरोना दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्याच पार्श्वभूमीवर मुखमंत्री उद्धव ठाकरेंनी एक राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केलंय. पुढील परिस्थिती नियंत्रणात आणल्याशिवाय कोणताही धार्मिक कार्यक्रम होणार नाही अशी त्यांनी घोषणा केलीय. दरम्यान त्यांनी मरकजमधील प्रकारावर प्रतिक्रिया दिलीय.

पाहा सविस्तर मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले...

 

सध्या महाराष्ट्रात वेगळीच परिस्थिती आहे. मरकजमध्ये गेलेल्या तबलिगी जमातीच्या काही लोकांना कोरोनाची लागण झालीय आणि त्यांच्यामुळे करोना पसरतोय असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यांतच फळांना, नोटांना काही मुस्लिम थुंकी लावत असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतायत. त्या कोरोना पसारवणाऱ्या नोटाना आणि फळांना थुंकी लावणार्याना सोडणार नाही अशी तंबी मुखमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलताना दिली. 

यासोबतच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांनी येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचीही घोषणा केलीय. येत्या ८ एप्रिलला मुस्लिम समाजाचा शब्बा हा सण आहे. त्यानुसार प्रत्येक धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्रात होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

Web Title - marathi news cm uddhav  thackeray's statement on people who spreading corona 

 

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live