पेट्रोल डीझेल पाठोपाठ CNG आणि LPG च्या दरात वाढ होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयांचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागलाय. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असताना CNG आणि LPG गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या LPG गॅसच्या दराची किंमत ऑक्टोबर महिन्यात ठरवण्यात येईल. देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या बेस प्राइजमध्ये प्रति युनिट १४ टक्के म्हणजे जवळपास २५२ रुपये वाढ होण्याचा अंदाज आहे. 

दरम्यान , आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ झालीय. पेट्रोलच्या दरामध्ये 9 पैशांची वाढ करण्यात आली असून. डिझेलच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 89.69 पैसे तर एक लिटर डिझेलसाठी 78.42 पैसे मोजावे लागतायत. गेल्या महिन्याभरात पेट्रोल तब्बल प्रतिलिटर 4 रुपये 85 पैशांनी भडकले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live