अजगरांची मुंबई...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

सिमेंटच्या जंगलाची मुंबई अशी या मायानगरीची ओळख. या मुंबईत पक्षी प्राणी कुठून येणार असा तुमचा आमचा समज खोटा ठरलाय. कारण मुंबईत चक्क अजगर सापडू लागलेत. मुंबईच्या वांद्रे परिसरात गेल्या महिनाभरात एक दोन नव्हे तब्बल 20 अजगर सापडलेत.

वांद्रे खाडीजवळची खारफुटी मेट्रो-3 प्रकल्पामुळे तोडून टाकण्यात आलीय. त्यामुळं अजगर मानवी वस्तीत शिरल्याचा दावा करण्यात येतोय.

मुंबईतली प्राणी आणि पक्षीसंपदा नागरिकीकरणाच्या रेट्यात नष्ट झाली. माहीम आणि वांद्रेच्या खाडीपट्ट्यात अस्तित्व टिकवून ठेवलेले अजगर आणि सापही आता विस्थापित झालेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live