हजारो कर्मचाऱ्यांना सरकारी कंपनीतून देणार नारळ! कोरोनाने सरकारी कर्मचाऱ्यांची घालवली नोकरी?

साम टीव्ही
शनिवार, 5 सप्टेंबर 2020
 • हजारो कर्मचाऱ्यांना सरकारी कंपनीतून देणार नारळ!
 • कोरोनाने सरकारी कर्मचाऱ्यांची घालवली नोकरी?
 • कसं चालणार सरकारी कंपनीचं काम?

कोरोनानं अनेकांची रोजीरोटी गमावलीय. त्यात अजून एक धक्कादायक बाब समोर आलीय. बीएसएनएल या सरकारी कंपनीतून तब्बल 20 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणाराय. तब्बल एक वर्षाहून अधिक काळ पगार न मिळालेल्या बीएसएनएल या सरकारी कंपनीतून कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार हे नक्की झालंय. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केलीय. याचा फटका आता सरकारी कंपन्यांनाही बसू लागलाय.

हजारो सरकारी कर्मचारी बेरोजगार!

बीएसएनएलनं याआधी 30 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केलंय. त्याहून धक्कादायक म्हणजे कर्मचाऱ्यांना आधीच एक वर्ष पगार मिळालेला नाहीये आणि आता ही कर्मचारी कपात. म्हणजे, दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था कर्मचाऱ्यांची झालीय. ही वेळ कंपनीवर का आलीय पाहुयात -

 •  BSNL कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या का गेल्या?
 • कर्मचारी कपात करण्याची परिस्थिती स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना जबाबदार
 • सेवानिवृत्ती योजना अमलात आली तेव्हा कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली
 • कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने नेटवर्क फॉल्टच्या तक्रारी वाढल्या
 • गेल्या 14 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही
 • पगार नियमित मिळत नसल्याने 13 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली
 • बीएसएनएलच्या एचआरने गेल्या एक सप्टेंबरला सर्व मुख्य व्यवस्थापकांना खर्चात कपात करण्याचे आदेश दिलेत. यात कंत्राटी कर्मचारी कमी करण्यास सांगितले होते. त्याच बरोबर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी ठेवण्याची गरज नसल्याचे म्हटलं. एवढ्या मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. त्यामुळे बीएसएनएलचे काम कसं चालणार असा प्रश्न निर्माण झालाय.
   


संबंधित बातम्या

Saam TV Live