वाढत्या थंडीला राज्यात ब्रेक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 जानेवारी 2020

पुणे - राज्यातील वाढत्या थंडीला ‘ब्रेक’ लागणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान घसरले असून, शनिवारी सर्वांत कमी तापमान नाशिक येथे ७.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. परंतु येत्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात पहाटे हलक्‍या धुक्‍यांसह हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर गोवा आणि विदर्भात लक्षणीय घट झाली. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला होता. परंतु अरबी समुद्रातून वाहणारे पश्‍चिमी वारे सोमवारपासून राज्यात प्रवेश करणार आहेत. यामुळे उत्तरी वाऱ्यांचा प्रवाह राज्यात कमी होईल. या पश्‍चिमी वाऱ्यांतील आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार आहे.

ढगाळ वातावरणाचा पुण्यामध्ये अंदाज
पुण्यात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता ९.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. दिवसाही गार वारे वाहत होते. सोमवार (ता. २०) ते मंगळवार (ता. २१) पर्यंत शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणाची स्थिती राहील. त्यामुळे किमान तापमानातसुद्धा वाढ होण्याची शक्‍यता आहे. किमान तापमानाचा पारा १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Web Title cold break in maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live