गणेश नाईकांचे साम्राज उलथवण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न

गणेश नाईकांचे साम्राज उलथवण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत यंदा आमदार गणेश नाईकांचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या छताखाली शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकवटल्यामुळे शहरात शीतयुद्ध सुरू झाले आहे.

खेळ मांडियेला, कार्यालयांचे उद्घाटन यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून वातावरण निर्मिती होत आहे. या परिस्थितीत नाईक समर्थकांनी फलकबाजीतून पुन्हा शहराला नाईकच का हवे आहेत, असे प्रश्‍न विचारणारे फलक लावून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या फलकांवर शहरात राबवण्यात आलेल्या मोठ्या प्रकल्पांचे श्रेय नाईकांना देण्याचा प्रयत्न केला आहे.

महापालिकेवर असणारी गेली 25 वर्षे गणेश नाईकांची एकहाती सत्ता काबीज करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्याकरीता राज्यातील सत्तेचा पूर्णपणे वापर आघाडीच्या नेत्यांकडून केला जाणार आहे. पक्ष कार्यालयांच्या उद्घाटनांचे भव्य कार्यक्रमांचे आयोजन, कार्यक्रमांना मंत्र्यांची हजेरी, नगरसेवकांची फोडाफोडी ही त्याची एक झलक आहे. शहरात आघाडीकडून होत असलेल्या वातावरण निर्मितीमध्ये भाजप व नाईकांची हवा कमी होत आहे. 

शहरातील नाईकांचा प्रभाव कमी होत असल्याची जाणीव त्यांच्या कार्यकर्त्यांना होत असल्यामुळे शहरात पुन्हा एकदा बॅनरबाजी करून नाईकच का हवेत, असा प्रश्‍न उपस्थित करून वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय नाईकांना दिले जाणारे छायाचित्र बॅनरवर झळकत आहेत.

विकासाचे श्रेय नाईकांना

पामबीच मार्गावर सानपाडा येथे लावण्यात आलेल्या भव्य बॅनरवर नाईकांचे नेतृत्व पुन्हा या शहराला मिळायला पाहिजे, असा आशय प्रसिद्ध केला आहे. यासह बॅनरवर महापालिकेने तयार केलेली सीबीएसई बोर्डाची शाळा, मोरबे धरण, सार्वजनिक रुग्णालयांच्या इमारती, मलनिस्सारण केंद्र, उद्याने, इलेक्‍ट्रिक बस, अपंगांचे ईटीसी केंद्र, घनकचरा व्यवस्थापन व अग्निशमन केंद्राचे छायाचित्र प्रदर्शित करून त्याचे श्रेय नाईकांना दिले आहे. प्रत्येक वेळी नाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या महाविकास आघाडीला यापुढे विकासाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न समर्थकांनी या बॅनरच्या माध्यमातून केल्याचे दिसून येते.

Web Title cold war stared navi mumbai between ganesh naik andmahavikasaghadi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com