परप्रांतिय मजुरांकडून रेल्वे आणि बस भाड्याचे पैसे वसूल करणे म्हणजे शोषण - प्रकाश आंबेडकर

साम टीव्ही
सोमवार, 4 मे 2020

परप्रांतिय मजुरांकडून रेल्वे आणि बस भाड्याचे पैसे वसूल करणे म्हणजे कामगारांचं शोषण असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

परप्रांतिय मजुरांकडून रेल्वे आणि बस भाड्याचे पैसे वसूल करणे म्हणजे कामगारांचं शोषण असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेने मोफत प्रवास करता येईल अशी माहिती भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलीय. याबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलणे झाले असल्याचं सांगत स्वामी यांनी प्रवासाचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 15 टक्के खर्च संबधित राज्यांना करावा लागेल.

याबाबत रेल्वे मंत्रालय अधिकृतपणे माहिती देईल असंही स्वामी यांनी दिलीय. त्यामुळं आता परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी रेल्वेने मोफत जाता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत प्रवास करू द्यावा अशी विनंती यापूर्वीच केंद्राकडे केली होती. 

परप्रांतिय मजुरांकडून रेल्वे आणि बस भाड्याचे पैसे वसूल करणे म्हणजे कामगारांचं शोषण असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना त्यांच्या गावी नेण्यासाठी रेल्वे आणि एसटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र मजुरांकडून केंद्र आणि राज्य सरकार तिकिट भाडं आकारतंय. तर दुसरीकडे मात्र परदेशात अडकलेल्या भारतीय कामगारांना कोणतंही भाडं न आकारता विमानाने भारतात आणण्यात आल्याचं सांगत हा भेदभाव नाही का ? असा सवाल आंबेडकरांनी केलाय. लॉकडाऊनच्या काळात काम बंद झाल्याने मजुरांकडे उपजीविकेसाठी पैसे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे कामगारांकडून भाडे न आकारता त्यांना त्यांच्या गावी सोडावे, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live