जिल्हाधिकाऱ्याची गांधीगिरी; सरकारी कार्यालयाची भिंत स्वत: केली स्वच्छ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेत, कार्यालयातील पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत चक्क जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  साफ केली.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला भेट दिली. यावेळी, त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, मंडळ अधिकारी भगवान थिटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण उपस्थित होते.

उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करीत, कामकाजाची माहिती घेतली. पाहणी दरम्यान, कार्यकारी अभियंता कार्यालयाला लागूनच असलेली भिंत पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली दिसताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तिथे थांबले. कार्यालयातील कर्मचाऱ्याला बादली, पाणी व कापड घेऊन बोलावले आणि बादलीतील पाणी व कापडाने, स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पानाच्या पिचकाऱ्या व थुंकींनी रंगलेली भिंत स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. कार्यालयातील भिंत स्वत: जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तेथे जमले व आश्चर्यचकित झाले.

कार्यालयातील भिंत जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता कार्यालयातील एका महिलेने ‘साहेब राहू द्या, आम्ही भिंत साफ करतो’ असे म्हणत भिंत साफ करण्याचे काम थांबविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी भिंत साफ करण्याचे काम थांबविले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live