गोविंदा गोपाळांचा रंगतदार पेहराव 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

कळंबोली : सध्याच्या काळात उत्सवाचे स्वरूप केवळ सणापुरते मर्यादित राहिलेले नाही. प्रत्येक सणाच्या निमित्ताने त्या सणाला साजेसा पेहराव करण्याचा ट्रेंड रुजू पाहत आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोपाळकाल्यासाठी बाजारात श्रीकृष्णाचा रंगतदार पेहराव विक्रीसाठी दाखल झाला असून, ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे बाजारात दिसून येत आहे. 

आता गोपाळकाला किंवा कृष्ण जन्माष्टमी सण अगदी नर्सरीपासून प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांतही साजरा केला जातो. त्यामुळे सार्वजनिक मंडळांसह शाळेतील रासलीलासाठी पालकांकडून ड्रेस खरेदी करण्यात येत आहे.  बाळगोपाळांना कृष्णाच्या रुपात पाहण्याचा मोह प्रत्येक माता-पित्याला असतो. आता गोपाळकाला किंवा कृष्ण जन्माष्टमी अगदी नर्सरीपासून प्राथमिक शाळेपर्यंत साजरी केली जाते.त्यामुळे नागरिकही अशा प्रकारचे विविधरंगी कृष्णाचे रूप असलेले कपडे खरेदी करताना दिसत आहे.

बाजारात ३०० रुपयांपासून ड्रेस उपलब्ध
गोपाळकाला निमिताने बाजारात अवघ्या ३०० रुपयांपासून ते अगदी २००० रुपयांपर्यंत कृष्णाचे पेहराव विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. पनवेलमध्ये छोट्या दुकानातील विक्रेत्यापासून ते थेट कपड्यांच्या मोठमोठ्या शोरूममध्ये  कपड्यांची खरेदी जोरात सुरू आहे. जुना भाजी-मार्केट परिसरात रंगीबेरंगी मटकी खरेदीलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

जुन्या पनवेलमध्ये पारंपरिक दहीहंडीलाच महत्त्व
अनेक वर्षांपासून जुन्या पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाचे पारंपरिक महत्त्व जपले जाते. जिथे देवांच्या हंड्या सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. लाईन आळी, बापट वाडा, परदेशी आळी, गावदेवी पाडा मंदिर, टपाल नाका येथील नवनाथ मंदिर या ठिकाणी वर्षानुवर्षे देवांच्या हंड्या लक्ष वेधून घेतात. यंदाही उत्सवाचे दिमाखात आयोजन करण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live