जैशचा कमांडर 'सज्जाद' ढगात; जवानांनी घेतला पुलवामा हल्ल्याचा बदला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

सज्जाद बट.. भारतात दहशतवादी कारवाया करणारा जैशचा कमांडर.. जम्मू-काशीमरच्या अनंतनागमध्ये सुरक्षादलानं केलेल्या कारवाईत सज्जादचा खात्मा झालाय. फेब्रुवारीमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याचा खऱ्या अर्थानं बदला घेत जवानांनी दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलंय. 

सज्जाद बट.. भारतात दहशतवादी कारवाया करणारा जैशचा कमांडर.. जम्मू-काशीमरच्या अनंतनागमध्ये सुरक्षादलानं केलेल्या कारवाईत सज्जादचा खात्मा झालाय. फेब्रुवारीमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याचा खऱ्या अर्थानं बदला घेत जवानांनी दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलंय. 

14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी त्यानं स्फोटकांनी भरलेली कार दिली होती. या हल्ल्यापासून सुरक्षादल सज्जादच्या मागावर होतं. अनंतनागच्या वाघोमात सज्जाद लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सज्जादसह दोन दहशतवादी ठार झाले. मात्र या चकमकीत देशाचा एक जवान कामी आलाय.  

14 फेब्रुवारीला पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. यात 40  जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणला होता. त्यानंतर भारतानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या. त्यामुळे दहशतवाद्यांसाठी पळता भुई थोडी झालीय. 

मोदी सरकार दोनमध्ये अमित शहांच्या खांद्यावर गृहमंत्रीपदाची धुरा येताच त्यांनी दहशतवाद्यांची टॉप टेन यादी तयार केली. या टॉप टेन यादीतला पहिला दहशतवादी जवानांच्या गळाला लागलाय. आता या जवानांच्या बंदुकीला वेध लागलेत ते उरलेल्या नऊ दहशतवाद्यांचे आणि तो दिवस आता फार दूर नसेल, ज्या दिवशी या सगळ्या दहशतवाद्यांचा खात्म झालेला असेल. 

WebTitle : marathi news commander of Jaish E Mohammad killed by Indian armed forces 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live