नारायण राणेंचे भाकित खरे ठरले , सिंधुदुर्गात जल्लोषाचे वातावरण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

भाजपचाच मुख्यमंत्री पुन्हा येईल असे आम्हाला वाटत होते. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना हा विश्वास होता. या राजकारण शिवसेना अपरिपक्व आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजकारणात सत्ता संघर्षाचे जे नाटक चालु होते ते जनता पाहात होती. त्यावर हसतही होती. पण हे त्यांना समजले नाही. 
- राजश्री धुमाळ, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप
 
कणकवली ( सिंधुदुर्ग ) -   मी परत आलोय...मी परत आलोय...अशा घोषणांनी कणकवली येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर सिंधुदुर्गात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  सिंधुदुर्गात नितेश राणे हे भाजपचे एकमेव आमदार आहे.  त्यामुळे कोकणतात भाजपवाढीसाठी राणेंना मंत्रीपद मिळणार का याचीची उत्सुकता आता लागून राहीली आहे. 

सरकार स्थापनेबद्दल प्रतिक्रिया देताना कणकवलीतील भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, मी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असे वारंवार फडणवीस सांगत होते. तसेच घडल्याने आनंद वाटत आहे. सकाळी सकाळी ही गोड बातमी ऐकायला मिळाली त्यामुळे आज आम्ही दिवाळी साजरी केली. कणकवली हे राणे यांचे गाव आहे. यामुळे येथे जल्लोष सुरू आहे.  खासदार नारायण राणे यांनी केलेले भाकित आज खरे ठरले आहे. हे आता जिल्ह्याला समजले आहे. राणे यांची भक्कम साथ भाजपला मिळणार आहे.  

भाजपचाच मुख्यमंत्री पुन्हा येईल असे आम्हाला वाटत होते. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना हा विश्वास होता. या राजकारण शिवसेना अपरिपक्व आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजकारणात सत्ता संघर्षाचे जे नाटक चालु होते ते जनता पाहात होती. त्यावर हसतही होती. पण हे त्यांना समजले नाही. 
- राजश्री धुमाळ, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: Comment On BJP NCP Government In Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live