अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा - गिरीश महाजन

अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा - गिरीश महाजन

धुळे :  "अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा," अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना घरचा आहेर केला आहे. 

अनिल गोटेंच्या बंडखोरीनंतर धुळ्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेरीस भाजपने गोटेंचा संघर्ष मोडीत काढत बहुमत मिळवलंय. तब्बल 50 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकलेत. तर गोटेंच्या लोकसंग्रामला मात्र अपेक्षित यश मिळालेलं नाही. अवघ्या 2 जागांवर गोटेंचे उमेदवार विजयी झालेत. 

"अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा. अनिल गोटेंनी निवडणुकीच्या काळात व्हॉटसअॅप, फेसबूक आणि सोशल मीडियावरजी भाषा वापरली, ती योग्य नव्हती. त्यांची भाषा धुळेकरांना मान्य नव्हती." अनिल गोटेंना टोला लागवताना महाजन पुढे म्हणाले, "अनिल गोटे यांच्या भाषेवरूनच त्यांचा  पराभव स्पष्ट दिसत होता. अनिल गोटे यांच्या  २ जागा आल्या, त्या आल्या कशा? हा प्रश्न मला आहे.  अण्णांच्या २ जागा आल्या, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो."

"अनिल गोटे यांना निवडणुकी आधी आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी ताठर भूमिका घेतली. मी सांगेन तेच उमेदवार घ्या असा त्यांनी आग्रह धरला. त्यांचं ऐकून उमेदवार दिले असते तर भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या दहावर सुद्धा गेली नसती. " असेही ते म्हणाले. 

WebTitle :: marathi news comments on anil gote after results of dhule municipal corporation election 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com