ढाकणेंनी रिपोर्ट दिला, आता सुभाष देशमुखांना बंगला पाडावा लागणार! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 जून 2018

सोलापूर : अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या बंगल्यांचा बांधकाम परवाना महापालिकेने परत घेतला आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह दहाजणांचे बंगले या जागेवर आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या रीट याचिकेवर 13 जूनला सुनावणी होणार आहे. 

या जागेवरील बांधकाम परवाना रद्द केल्याची चर्चा काल रात्री उशीरा रंगली होती. आज माहिती घेतली असता बांधकाम परवानगी मागे घेण्यात आली आहे व तसा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

आरक्षित जागेवर बांधकाम परवाना दिल्या प्रकरणी महापालिकेवर कारवाई करावी अशी महेश चव्हाण या सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार अहवाल देण्याचे आदेश आयुक्ताना दिले. मात्र त्याची कार्यवाही न झाल्याने नितीन भोपळे यानी अवमान याचिका दाखल केली. त्यानुसार 31 मे पुर्वी अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार आयुक्त अविनाश ढाकणे यांनी अहवाल सादर केला आहे. सदरची बांधकाम परवानगी परत घेत असल्याचे त्यात म्हटले आहे. 

महापालिकेने बांधकाम परवाना मागे घेतला तर मी स्वतः बंगला पाडतो असे वक्तव्य श्री देशमुख यांनी केले होते. आता महापालिकेने परवाना मागे घेतला आहे. त्यामुळे आता श्री देशमुख काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live